प्रवेश अपडेट
📢 सुधारित तृतीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया कार्यक्रम (२०२६-२७) जाहीर! अर्जाची अंतिम मुदत: १४.०८.२०२६ | Spot Round (जागेवर प्रवेश फेरी): २७.०८.२०२६ ते २८.०८.२०२६ — सविस्तर वेळापत्रकासाठी येथे क्लिक करा! 📢 सुधारित तृतीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया कार्यक्रम (२०२६-२७) जाहीर! अर्जाची अंतिम मुदत: १४.०८.२०२६ | Spot Round (जागेवर प्रवेश फेरी): २७.०८.२०२६ ते २८.०८.२०२६ — सविस्तर वेळापत्रकासाठी येथे क्लिक करा!
Logo

निनाई देवी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित

श्री शिवाजीराव देशमुख कृषी तंत्र विद्यालय करुंगली - आरळा

(महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्याशी संलग्न)

प्रवेश माहिती पुस्तिका

अभ्यासक्रम तपशील

अभ्यासक्रम कृषि तंत्र पदविका (पूर्ण मराठी माध्यम)
कालावधी दोन वर्षे
प्रवेश क्षमता ६० जागा
विद्यालय कोड ७०५

शैक्षणिक पात्रता

अर्जदार महाराष्ट्रातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाची इयत्ता १० वी परीक्षा किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावी.

प्रवेश सुरू....!

आजच आपला प्रवेश निश्चित करा..!

आपला प्रवेश अर्ज विद्यापीठ ऑनलाइन किंवा कॉलेजला भेट देऊ शकता.

महत्वाचे: ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया

अर्जदाराने शैक्षणिक पात्रतेनुसार फक्त एकच प्रवेश अर्ज mpkv.diplomaadmission.com या लिंक वर भरावा.

  • अर्जदार हा महाराष्ट्रातील रहिवाशी असावा
  • कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रमाच्या अर्जदारांना प्रवेश रहिवाशी जिल्हानिहाय दिला जाईल
  • प्रवेश अर्जाची प्रत किंवा इतर कागदपत्रे टपालाने/कुरिअरने किंवा स्वतः पाठव नये
  • प्रवेश लिंक वर अर्जे भरल्यानंतर पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र आणि सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत

प्रवेश अर्ज शुल्क

प्रवर्ग शुल्क रक्कम
खुला प्रवर्ग रु. ४००/-
आरक्षित प्रवर्ग रु. २००/-

शुल्क नेट बँकिंग, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वार भरावे. प्रवेश अर्ज शुल्क ना परताव आहे.

प्रवेशासाठी वयोमर्यादा

  • अर्जदाराचे वय दिनांक १५.०६.२०२५ रोजी वय ३० वर्षांपेक्षा कमी असावे
  • मागासवर्गीय विद्यार्थासाठी वयाची अट ५ वर्षासाठी शिथिल असेल
  • माजी सैनिकांसाठी वय ४५ पेक्षा कमी असावे

उज्वल यशाची १०० % परंपरा

  • कु. नितीन जान: पुणे कृषी विद्यालय, दुसऱ्या वर्षात थेट प्रवेश
  • का. सुप्रिया वाळके: पुणे कृषी विद्यालय, दुसऱ्या वर्षात थेट प्रवेश
  • कु. सुभान फकीर: कोल्हापूर कृषी विद्यालय, दुसऱ्या वर्षात थेट प्रवेश

व असे अनेक विद्यार्थी यशच्या परंपरेमध्ये....!

प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे

  1. इयत्ता १० ची अभ्यासक्रमांचे मूळ प्रमाणपत्र
  2. शाळा सोडल्याचा दाखला / बोनाफाइड सर्टिफिकेट
  3. गॅप प्रमाणपत्र (१० वी, ११ वी, १२ वी नंतर शैक्षणिक खंड असल्यास, तहसीलदार/नायब तहसीलदार यांचे स्वाक्षरी व शिक्का असलेले)
  4. निवास प्रमाणपत्र / रेशन कार्ड / आधार कार्ड
  5. जात प्रमाणपत्र आणि नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  6. शेतकरी प्रमाणपत्र (परिशिष्ट 'ब') किंवा भूमिहीन शेतमजूर प्रमाणपत्र (परिशिष्ट 'अ')
  7. ७/१२ उतारा आणि ८अ उतारा (१२% कृषी अधिभारासाठी)
  8. उत्पन्न प्रमाणपत्र (०१.०४.२०२५ रोजी किंवा त्यानंतर जारी केलेले)
  9. प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र (लागू असल्यास - जिल्हा पुनर्वसन अधिकारी कडून)
  10. NCC प्रमाणपत्र (लागू असल्यास - सक्षम अधिकारी कडून)
  11. माजी सैनिक / संरक्षण कर्मचारी प्रमाणपत्र (लागू असल्यास - Discharge Certificate)
  12. स्वातंत्र्यसैनिक प्रमाणपत्र (लागू असल्यास - स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना/नातवंडांना)

महत्वाची प्रमाणपत्रे आवश्यकता

सर्व आवश्यक प्रमाणपत्रांबद्दल तपशीलवार माहितीसाठी, कृपया अधिकृत MPKV प्रवेश पोर्टलला भेट द्या.

📌 पोर्टल वैशिष्ट्ये:
• सर्व श्रेणींसाठी तपशीलवार प्रमाणपत्र आवश्यकता
• नमुना फॉरमॅट आणि मार्गदर्शक तत्त्वे
• नवीनतम सूचना आणि अपडेट

प्रवेश कार्यपध्दती - सूचना

1

ऑनलाईन प्रवेश पोर्टल

अर्जदाराने mpkv.diplomaadmission.com या लिंकद्वारे प्रवेश घ्यावा आणि विद्यालय कोड ७०५ निवडावा.

2

अर्ज काळजीपूर्वक भरा

प्रवेश अर्ज सादर केल्यानंतर अर्जदाराचे कोणतीही अतिरिक्त कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत.

3

परिपूर्ण अर्ज सादरीकरण

सर्व दृष्टिने परिपूर्ण भरलेला तसेच प्रवेश वेळापत्रकात दिलेल्या शेवटच्या तारखेस प्रवेश लिंकवर भरलेला अर्ज प्रवेशासाठी ग्राहय धरला जाईल.

4

कागदपत्रे वाचनीयता आवश्यकता

स्कॅन करून प्रवेश लिंकवर अपलोड केलेले मुळ कागदपत्रे वाचनीय असावेत. याची खात्री करूनच कागदपत्रे अपलोड करावीत. अपलोड केलेली मुळ कागदपत्रे वाचनीय नसल्यास ते ग्राहय धरण्यात येणार नाहीत व त्याची जबाबदारी पुर्णतः अर्जदाराची असेल.

5

छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड आवश्यकता

अर्जदाराचे पासपोर्ट आकाराचे सद्याचे स्वतःचे छायाचित्र व स्वतःची स्वाक्षरी प्रवेश लिंकवर अपलोड करावी.

6

कृषि तंत्र पदविका अर्ज सबमिशन

  • अ. कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रमासाठी अर्ज भरलेल्या पात्र अर्जदाराचा प्रवेश हा रहिवाशी जिल्ह्यात दिला जाईल. अर्जदार ज्या जिल्ह्याचा रहिवाशी आहे, त्या जिल्ह्यातील कृषि तंत्र निकेतनात प्रवेश मिळेल.
  • ब. कृषि तंत्र निकेतन अभ्यासक्रमासाठी अर्जदाराचा प्रवेश हा विद्यापीठ कार्यक्षेत्रातील दहा जिल्ह्यात दिला जाईल.
7

गुणपत्रिका प्रमाणपत्र आवश्यकता

अर्जदाराने सक्षम प्राधिकाऱ्याकडून (तहसीलदार/मामलतदार/नायब तहसीलदार/कृषी अधिकारी/तलाठी) निर्धारित फॉरमॅटमध्ये गुणपत्रिका प्रमाणपत्र मिळवावे. प्रमाणपत्रात मिळालेले टक्केवारी किंवा ग्रेड स्पष्टपणे नमूद असावे. पात्र अर्जदारांचा रहिवाशी जिल्हा सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्म ठिकाणचा उल्लेख असलेला शाळा सोडल्याचा दाखला किंवा महाराष्ट्र राज्यातील सक्षम अधिकारी कडून जारी केलेले निवास प्रमाणपत्र यावर आधारित निश्चित केला जाईल.

8

पेमेंट व कागदपत्रे अपलोड

पेमेंट नंतर लॉग इन करून विद्यार्थी त्याच्या Log in मध्ये 'Documents Upload' या बटनावर किंवा 'Grievance' या लिंकद्वारे त्याची उरलेली कागदपत्रे अपलोड करू शकतो. सदर सुविधा विद्यार्थ्याला स्वतः किंवा योग्य अधिकृत केंद्रांद्वारे उपलब्ध होईल.

9

सबमिट नंतर दुरुस्ती नाही

अर्ज सबमिट केल्यानंतर कोणतीही दुरुस्ती स्वीकारली जाणार नाही. mpkv.diplomaadmission.com या प्रवेश लिंकवर अंतिम सबमिशन करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक तपासावी. सर्व प्रविष्टी केल्यानंतर अंतिम गुणधारा यादी प्रवेश लिंकवर प्रसिद्ध करण्यात येईल.

10

अनालायटिका बिझनेस सोलुशन

अनालायटिका बिझनेस सोलुशन, पुणे तर्फे अ. कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रमासाठी संबंधित कृषि तंत्र विद्यालयाच्या जिल्हानिहाय व विद्यालय निहाल गुणधारा यादी mpkv.diplomaadmission.com या प्रवेश लिंक वर प्रसिध्द करण्यात येईल.

11

लॉगिन प्रक्रिया

प्रवेश वाटप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर अर्जदाराने mpkv.diplomaadmission.com या प्रवेश लिंकवर स्वत:च्या login ID आणि Password दिल्यानंतर प्रवेश पत्र प्राप्त करून घ्यावे.

12

तक्रार निवारण कालावधी

कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रमासाठी जिल्हानिहाय आणि कृषि तंत्र निकेतन अभ्यासक्रमासाठी विद्यापीठ कार्यक्षेत्रानिहाय गुणधारा यादी प्रवेश लिंकवर प्रसिद्ध करण्यात येताच 'Grievance Redressal Period' सुरू होईल. सुरू झाल्यानंतर अर्जदाराला प्रवेश लिंकवर Log in द्वारे उरलेल्या कागदपत्रांची माहिती भरू शकेल.

13

कॉलेजमध्ये कागदपत्र तपासणी

अर्जदाराने तपासणीसाठी मूळ कागदपत्रे आणावीत ज्यात समाविष्ट आहे: गुणपत्रिका प्रमाणपत्र, टक्केवारी प्रमाणपत्र किंवा ग्रेड कार्ड, मूळ पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, जात प्रमाणपत्रांच्या प्रती, उत्पन्न प्रमाणपत्र, निवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग सुविधा. तपासणीनंतर स्पॉट प्रवेश प्रक्रिया पार पाडली जाईल.

14

प्रवेश पुष्टीकरण

कागदपत्र तपासणी आणि शुल्क भरण्यानंतर प्रवेश पुष्टीकरण केले जाईल. पूर्ण प्रवेश प्रक्रिया पूर्ण न करता आणि गुणधारा यादी ऑनलाईन प्रसिद्ध न करता अर्जदार प्रवेशाची मागणी करू शकत नाहीत.

तक्रार निवारण समिती

तक्रार निवारण समिती:

मा. सहायक अधिचार (कुलगुरु), महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अध्यक्ष
कृषि विद्यापीठातील संचालक कृषि तंत्र विद्यालये/कृषि तंत्र निकेतन दोन वरिष्ठ प्राचार्य सदस्य
कृषि विद्यापीठांकरीता मा. कुलसचिव किंवा त्यांची नमुनीत अधिकारी (कृषि), माहिती अधिकारी यांचे प्रतिनिधी सदस्य
कृषि विद्यापीठांकरीता मा. कुलसचिव किंवा त्यांची नमुनीत अधिकारी (कृषि), माहिती अधिकारी यांचे प्रतिनिधी सदस्य-सचिव

कृषि तंत्र पदविकासाठी जिल्हानिहाय प्रवेश

कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रमासाठी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील दहा जिल्ह्यांपैकी प्राप्त झालेल्या प्रवेश अर्जांमधील पात्र अर्जदारांचे जिल्हानिहाय व विद्यालय निहाय गुणधारा यादी mpkv.diplomaadmission.com या प्रवेश लिंकवर प्रसिद्ध करण्यात येईल. अर्जदारांनी स्वत:च्या login ID आणि Password दिल्यानंतर त्यांच्या शैक्षणिक पात्रतेची आणि गुणधारा यादी प्राप्त करून घ्यावी.

अतिरिक्त प्रशिक्षण/अभ्यासक्रम

  • नर्सरी
  • शैक्षणिक भ्रमण
  • मशरूम प्रशिक्षण
  • आणि इतर विशेष प्रशिक्षण कार्यक्रम

प्रवेश क्षमता

अभ्यासक्रम एकूण जागा
कृषी डिप्लोमा ६० जागा

आरक्षण धोरण

भारतीय संविधानानुसार मंडळ आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण आणि सेवा योजना विषयक क्र. ठोईयप्र १०१४/(१३०३)/तांत्र.१ दिनांक ३ जून, १९९४ मधील परिच्छेद क्र. ४ मध्ये विहीत केल्याप्रमाणे एकूण ७० टक्के जागा आरक्षीत करण्यात येतील.

वैयक्तिक आरक्षण (टक्केवारी)

वर्ग आरक्षीत जागांची टक्केवारी
अनुसूचित जाती व नवबौध्द 13%
अनुसूचित जमाती 7%
गौ विमुक्त जाती (अ) (दौ.जे.अ. / डी.टी.ओ.) (१४ व तत्सम जाती) 3%
ब) भटक्या जमाती (ब) (जानेवार १९९० पूर्वाचा २८ व तत्सम जाती) (एन.टी.ब) 2.5%
क) भटक्या जमाती (क) (एन.टी.सी.) (भूमाफ व तत्सम जाती) 3.5%
ड) भटक्या जमाती (ड) (एन.टी.डी.) (तेलारी व तत्सम जाती) 2%
इतर मागास वर्ग (OBC) 19%
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) 10%
सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागील वर्गाप (SEBC) वगळता घटकांसाठी * 30%
एकूण 70%

समांतर आरक्षण

वरील आरक्षणाच्या प्रत्येक प्रवर्गात प्रवेश प्रक्रियेच्या वेळेस प्रचलित शासन निर्णयांनुसार सदर दरमेयाने:

समांतर आरक्षण जागा
शेतकरी-यांचे मुले (अ.जी) 5
स्वातंत्र्य सैनिकांचे मुले (O.F) 2
महाराष्ट्र शासनाच्या प्रकल्प दिव्यांगात पुनर्वसन अधिनियम १९९९ नुसार प्रकल्प दिव्यांगात व्यक्ती आणि त्यांचे मुले (मो.प्र.पी) 4
आजी व आजोबा हौशकांरी मुले (जी.पी) 2
दिव्यांग (४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या जिल्ह्याल्याच्या गुणधराचेनुसार प्रमाणपत्र आदयश्यक) (पी.एच) 3
महिला 30
अनाथ 1

शुल्क रचना - विना अनुदानित (MPKV approved fees)

विना अनुदानित कृषी डिप्लोमासाठी शुल्क रचना (मंजूर)

(अ) शुल्क (स्पर्धे)

सर्वसाधारण शुल्क प्रथम वर्ष द्वितीय वर्ष
शिक्षण शुल्क ₹30,000 ₹30,000
प्रवेश शुल्क ₹1,000 ₹1,000
नोंदणी शुल्क ₹500 ₹500
वाचनालय शुल्क ₹100 ₹100
परीक्षा शुल्क ₹1,200 ₹1,200
अनामत शुल्क * ₹100 --
सत्र शुल्क ₹100 ₹200
ओळखपत्र शुल्क ₹100 --
वैद्यकीय शुल्क ₹50 ₹50
विद्यार्थी विमा हप्ता ₹100 ₹100
जिमखाना शुल्क ₹150 ₹150
एकूण शुल्क (स्पर्धे) (अ) ₹33,400 ₹33,300

(ब) वसतीगृहांत राहू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी

वसतीगृह शुल्क प्रथम वर्ष द्वितीय वर्ष
वसतीगृह शुल्क ₹1,000 ₹1,000
भोजन शुल्क ₹100 ₹100
मेस (खानावळ) डिपॉझिट ** ₹1,000 --
विद्युत बील आकार ₹1,000 ₹1,000
एकूण शुल्क (स्पर्धे) (ब) ₹3,100 ₹2,100
एकूण शुल्क (स्पर्धे) (अ) + (ब) ₹36,500 ₹35,400

* विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण झालेनंतर परत करायची रक्क्म

** सेवा उपलब्ध असल्यास विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण झालेनंतर परत करायची रक्क्म

महत्वाचे: ही शुल्क रचना फक्त विना अनुदानित विद्यार्थ्यांसाठी आहे. सर्व शुल्क MPKV approved fees केले आहेत. अतिरिक्त किंवा अमंजूर शुल्क आकारले जात नाहीत. शुल्क रचना प्राधिकरण निर्देशांनुसार सुधारण्यासाठी अधीन आहे.

प्रवेशसाठी व अधिक माहितीसाठी

संपर्क मोबाइल नंबर: 97709032483

स्थान: करुंगली-आरळा, तालुका शिराळा, जिल्हा सांगली